राष्ट्रीय स्तरावरील परिषद आम्हा मुलांचा अधिकार तंबाखू मुक्त शाळा तंबाखू मुक्त गाव यासाठीची आयोजित बालपरिषदेत महाराष्ट्र विद्यालय बार्शी मधील 8 वी ची विद्यार्थिनी कु.आदिती संतोष देशमुख या विद्यार्थिनीने सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले शाळेच्या वतीने श्री.संग्राम देशमुख सर बालपरिषदेस उपस्थित होते
सोलापूर/उस्मानाबाद
ईसंजीवनी सुपर स्पेशालिटी कॅन्सर & सर्जिकल हॉस्पिटल बार्शी येथे कॅन्सर रुग्णांसाठी मोफत फिझिओथेरपी उपचार शिबीर संपन्न झाले,
ग्रामीण भागात आजही शेत / पाणंद रस्ते, बांधावरून शेतकऱ्यांमध्ये पिढ्यानपिढ्या वाद, तंटे सुरू आहेत. अशा वादांमुळे आपला वेळ खर्ची होवून, एकमेकांचे आर्थिक नुकसान होत आहे. याचा तोटा येणाऱ्या पुढच्या पिढीला बसत असून, आपण सर्वांनी मिळून, एकत्रित संवाद साधून, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेत यांमधून यशस्वी मार्ग काढण्यासाठी मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने प्रयत्न करीत असल्याची भावना आमदार राजाभाऊ राऊत यांनी कोरफळे येथे व्यक्त करीत, तालुक्यातील शेतकऱ्यांनी यांकरीता सहकार्य करण्याचे आवाहन केले.
बार्शी : शहरातील नगर परिषद जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पुरातन नृसिंह देवाच्या लहान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
शिवज्योतीसाठी दोनशे, जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांच्या उपस्थितीसाठी मान्यता
के.एन. भिसे आर्टस, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स महाविद्यालयातील आय. क्यू. ए. सी. मार्फत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पू. अ. होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांनी भूषवले. महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शैक्षणिक आणि प्रशासकीय कामे समांतर गतीने चालली पाहिजेत असे प्रतिपादन डॉ शिंदे यांनी केले.
अकलुज येथे द ग्रीन फिंगर्स स्कुलच्या रायफल शुटींग रेंज व अटल लॅब चे उदघाटन माजी...
शिवजन्मोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन बार्शी कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी मागील अनेक दिवसांपासून त्याचा परिणाम व्यापारावर, छोट्या व्यावसाईकांवर होता. आमच्या मंडळाचे आधारस्तंभ हेच व्यापारी, छोटे व्यावसाईक आहेत.
स्वच्छ शाळा - सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत लोकसेवा विद्यालय आगळगाव प्रशालेचा बार्शी तालुक्यात प्रथम क्रमांक आला प्रशालेच्या या बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे, शिक्षण संचालक टेमकर, शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशालेचा सन्मान करण्यात आला
आत्मनिर्भर भारत अंतर्गत तालुकास्तरीय मार्गदर्शन शिबिर माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.एन. भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, विद्यानगर, भोसरे येथे नेहरू युवा केंद्र सोलापूर व सनराईज फाउंडेशन, सोनके यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर भारत अंतर्गत आजादीचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध विषयावर तालुकास्तरीय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सोलापुरातील डाळिंबी आड येथे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने वाचनालय व अभ्यासिका बांधण्यात येणार असून त्या वास्तूचे भूमिपूजन नगरसेवक विक्रांत वानकर यांच्या हस्ते पार पडले .
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत . शाळा सुरू करण्याबाबत पालकांनी आग्रह धरला आहे . या पार्श्वभूमीवर शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सोमवार दि . ७ फेब्रुवारी २०२२ पासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात आला.
बार्शी शहरातील सुयश विद्यालय येथे, बार्शी शहर व तालुक्यातील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी येथे माझी वसुंधरा प्रबोधन कार्यक्रम व विविध उपक्रम
कॉन्फिडन्स फिल्म प्रॉडक्शन चे फाऊंडर तसेच सुंबडीत कोंबडी व ती अणि मी या वेब सिरीजचे लेखक दिग्दर्शक व निर्माता रोहित देशमुख बार्शी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी बार्शी नगरपरिषदेच्या अंतर्गत एक अभिनव उपक्रम बार्शी शहरात राबवला.
राजे प्रतिष्ठान कामगार सेना माळशिरस तालुका यांच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा कार्यक्रम उत्साहात साजरा
उस्मानाबाद जिल्हा परिषदेत माध्यमिक उपशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार
बार्शी तालुक्यातील वैराग-हिंगणी-मळेगांव -चिखर्डे-गोरमाळा-पांगरी-उक्कडगांव ते जिल्हा हद्द, हा ३० किमी. लांबीचा रस्ता दुरुस्ती करणेकामी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली.